जिंजर चिकन | Ginger Chicken

जिंजर चिकन Ginger Chicken Recipe

साहित्य : 

पाव वाटी जाडसर किसलेले आले, १ चमचा लिंबाचा रस, पाव किलो बोनलेस चिकन, १ वाटी बारीक चिरलेला कोबी, २ सिमला मिरच्या बारीक चिरून, २ चमचे चिकन सॉस, मीठ, मिरीपूड आणि थोडं चीज 

कृती : 

एका पॅनमध्ये थोडं बटर तापवून घ्या. त्यावर आलं घालून थोडंसंच परता. आता थोडे आले बाजूला काढून ठेवा आणि पॅनमध्ये सिमला मिरच्या बटरमध्ये परतून घ्या. 

यात चीज आणि सॉस , कोबीसोबत परतून घ्या. 

आता त्यात चिकन घालून थोडं मीठ घाला. हे चिकन मंद आचेवर शिजवून घ्या. 

चिकन शिजल्यावर त्यात मिरेपूड आणि आधी काढून ठेवलेलं आले घाला, सगळे नीट मिक्स करा आणि गरम गरम हे चिकन सर्व्ह करा. 

ginger chicken recipe, ginger chicken, ginger chicken gravy, garlic ginger chicken, जिंजर चिकन, indian ginger chicken recipe, ginger chicken indian, ginger chicken indian,