तीळ ड्रायफ्रूट लाडू | Til Dryfruit Ladoo

तीळ ड्रायफ्रूट लाडू Til ladoo with dryfruits

साहित्य :

दोन वाट्या पांढरे तीळ, एक वाटी जाड पोहे, दोन टे. स्पू. काजूचे काप, दोन टे. स्पू. बदामाचे काप, दोन टे. स्पू. पिस्त्याचे काप, दोन टे. स्पू. चारोळ्या, दोन टे. स्पू. डिंक, सुंठ पावडर एक टे. स्पू., १ टी. स्पू. वेलची पूड, एक टी. स्पू. जायफळ पूड, तूप, गूळ.


कृती :

कढईत प्रथम तीळ कोरडी भाजून घ्या.

तुपात पोहे-डिंक-काजू-बदाम-पिस्त्याचे काप – चारोळ्या तळून घ्या.

परातीत तळलेले पदार्थ घेऊन त्यात तीळ-सुंठ पावडर, जायफळ-वेलची पूड टाकून मिक्स करा.

गरजेप्रमाणे किंवा चवीनुसार गूळ किसून घ्या. सर्व एकत्र करून दोन्ही हातांनी मिसळून घ्या.

गरजेप्रमाणे तूप पातळ करून मिक्स करावे आणि लाडू वळवावेत.

थंडीच्या दिवसांत हे लाडू गुणकारी व फायदेशीर ठरतात.