चिकन मंचुरियन | chicken manchurian

चिकन मंचुरियन chicken manchurian recipe

साहित्य : 

३ वाट्या बोनलेस चिकन, २-४ चमचे सोया सॉस, २ चमचे चिली सॉस, २ चमचे टोमॅटो सॉस, अर्धी वाटी कॉर्नफ्लोर, २ वाट्या बारीक चिरलेला कोबी आणि पातीचा कांदा, मीठ, मिरेपूड, २ सिमला मिरची आणि २ चमचे मंचुरियन सॉस, ३ चमचे आले लसूण पेस्ट 

कृती : 

मंचुरियन सॉस, मीठ आणि चिकन एकत्र करून नीट कालवून घ्यावे. त्यात कॉर्नफ्लोर मिक्स करावे. आणि हे चिकन छान तळून घ्यावे. 

एका पॅनमध्ये आता तेल तापवावे. त्यावर आले लसूण पेस्ट, सिमला मिरची आणि कोबी मध्यम आचेवर परतून घ्यावा. आता यात सर्व सॉस घालावे आणि मिश्रण मोठ्या आचेवर परतावे. 

मीठ, ४ वाट्या पाणी आणि तळलेले चिकन घालून मंचुरियन शिजवावे. 

कॉर्नफ्लोरची थोड्या पाण्यात पेस्ट करावी आणि ती या मिश्रणात टाकावी. त्याने मिश्रणास घट्टपणा येतो. 

वरून कांद्याची पात टाकून हे चिकन मंचुरियन गरमा गरम सर्व्ह करावे. 

chicken manchurian, chicken manchurian recipe, chicken manchurian dry, chicken manchurian gravy, chicken manchurian recipe in marathi, how to make chicken manchurian, how to make chicken manchurian in hindi, marathi nonveg recipes, chicken recipes,