गव्हाच्या पिठापासून तयार करा चटपटीत नॅचो चिप्स | Nachos Recipe

चटपटीत नॅचो चिप्स

नॅचो चिप्स हा तसा मूळचा मेक्सिकन पदार्थ. पण आपल्याकडे हा पदार्थ चिप्सच्या प्रकारांमध्ये कधी येऊन रुळला हे कळले सुद्धा नाही. काही हॉटेल मध्ये आजकाल कटलेट वगैरे प्रकारांसोबत बटाटा चिप्स ऐवजी नॅचोज दिले जातात. याला फॅशन म्हणूया किंवा आवड.

आपल्याला जर हे नॅचोज घरी बनवायचे असतील तर हे एकदम सोपे असतात आणि आपण खास आज गव्हाच्या पिठाचे नॅचोज कसे बनवायचे ते बघूया. म्हणजे ते आणखी पौष्टिक होतात. 

साहित्य :

1 कप गव्हाचे पीठ, 1/4 कप बेसन, 1/2 चमचा हळद, 1/2 चमचा ओवा, चवीनुसार मीठ, तेल आवश्यकतेनुसार

nachos recipe in marathi
how to make nachos at home marathi image from pixabay

कृती :

सर्वप्रशम नॅचो बनवण्यासाठी एका भांड्यात गव्हाचे पीठ, बेसन, 1 चमचा तेल, हळद, मीठ एकत्र करून घ्या.

आता त्यात थोडे पाणी घालून पीठ घट्ट मळून घ्या आणि ते पीठ 20-25 मिनिटे बाजूला ठेवा.

आता पिठाचे मोठे गोळे बनवा आणि पीठ चौकोनी आकारात लाटून घ्या.

चाकूच्या मदतीने पीठ चौकोनी आकारात कापून घ्या आणि नंतर त्रिकोणी आकारात कापून घ्या.

याचप्रमाणे सर्व गोळे लाटून कापून घ्या.

आता कढईत तेल गरम करण्यासाठी मध्यम आचेवर ठेवा.

तेल गरम होताच त्यात नॅचो घालून ते सोनेरी होईपर्यंत तळा.

त्याचप्रमाणे सर्व नॅचो तळून प्लेटमध्ये काढा.

त्यांना टोमॅटो सॉस किंवा चटणी बरोबर सर्व्ह करा.

तुम्हाला हि रेसिपी आवडली असल्यास आपल्या मित्रमंडळी आणि नातेवाईकांसोबत नक्की शेअर करा. 

हे सुद्धा वाचा : 

चिकन लॉलीपॉप घरी बनवा या सोप्या पद्धतीने 
पेरूची चटकदार कोशिंबीर कशी बनवावी? 

फक्कड चहा असा बनवा