मँगो चीज केक 

मँगो चीज केक 

उन्हाळा सुरू झाला की आपल्या घरात दोन गोष्टी नक्की येतात एक म्हणजे फ्रीजमध्ये थंड पाण्याच्या बाटल्या आणि आंबे!

आंबा हा फक्त फळ नसतो, तो अक्षरशः एक भावना असते. आणि त्या भावनेला जर थोडंसं creamy, cheesy आणि dessert-style twist दिलं, तर तयार होतो मँगो चीज केक.हा केक म्हणजे bakery-style sophistication आणि घरच्या आंब्याची गोडी यांचं भन्नाट combination. विशेष म्हणजे हा recipe एवढा complicated नाही, जितका तो Instagram वर दिसतो!
थोडा patience, थोडं mixing आणि आंब्याविषयी भरपूर प्रेम एवढंच लागतं.

हा ब्लॉग वाचेपर्यंत कदाचित तुमच्या मनात एकच विचार येईल “हा मँगो चीज केक आजच करून बघायचा!” 

mango cheese cake recipe in marathi boli marathi
मँगो चीज केक

मँगो चीज केक दोन प्रकारचे असतात.

* Bake केलेला
* No-Bake

आज आपण बनवणार आहोत No-Bake Mango Cheesecake
कारण:

* त्यासाठी Oven ची गरज नाही
* Beginner friendly आहे
* आणि चवीला absolutely dreamy लागतो!

मँगो चीज केक साहित्य (8-10 slices साठी):- 

बेससाठी :

* २ पाकिटं digestive biscuits / मारी बिस्किटं
* ५-६ चमचे melted butter

Cheesecake Filling साठी :

* १ कप क्रीम चीज
* अर्धा कप fresh cream
* अर्धा कप पिठीसाखर 
* १ कप आंब्याचा pulp (तुमच्या आवडीचा कोणताही रसाळ आंबा घ्या)
* १ चमचा vanilla essence
* १ चमचा जिलेटीन किंवा अगर अगर पावडर 

Mango Topping साठी :

* अर्धा कप mango pulp
* १ चमचा साखर
* थोडे आंब्याचे चौकोनी तुकडे decoration साठी

मँगो चीज केक कृती:- 

सगळ्यात आधी biscuits mixer मध्ये टाका आणि त्याचा बारीक चुरा करा.
तो अगदी wet sand सारखा दिसायला हवा.

आता त्यात melted butter मिसळा.

हे मिक्सचर हातात घेतले की हलक press झाल पाहिजे.जर खूप dry वाटत असेल तर अजून थोडं butter घाला.

आता cake tin किंवा glass dish घ्या आणि हे biscuit mixture खाली व्यवस्थित दाबून सेट करा.

हा step boring वाटतो पण perfect base म्हणजे perfect cheesecake! एकदा मस्त बेस सेट झाला कि आपला  मँगो चीज केक एकदम भारीच होणार. 

Dish १५-२० मिनिटं फ्रिजमध्ये ठेवा.

आता खरी जादू सुरु होईल, बघा आता पुढे काय करायचे ते, 

एका मोठ्या bowl मध्ये cream cheese घ्या.

ते smooth होईपर्यंत whisk करा.
लक्षात ठेवा lumps/ गुठळ्या राहिल्या तर cheesecake ची मजा जाते 

आता त्यात powdered sugar/ पिठीसाखर, vanilla essence आणि fresh cream घाला.

मिक्स करताना texture इतकं silky होतं की थोडं चाटण्याचा मोह होणारच!

यानंतर mango pulp घाला.

एव्हाना आंब्याच्या सुवासाने भूक नक्कीच खवळली असेल. बस आता थोडीच कृती करायची आहे. 

एका छोट्या bowl मध्ये gelatin थोड्या गरम पाण्यात मिक्स करा.

जर तुम्ही vegetarian version करत असाल तर अगर अगर वापरा.

हे मिक्सचर cheesecake filling मध्ये mix करा.

आता fridge मधला biscuit base बाहेर काढा आणि त्यावर हे creamy mango filling ओता.

Dish हलक्या हाताने tap करा म्हणजे air bubbles निघून जातील.

आता सर्वात कठीण काम…
वाट पाहणं!

हो, cheesecake किमान ५-६ तास refrigerate करावा लागतो.
Overnight ठेवला तर अजून मस्त सेट होतो.

Topping:- 

एका छोट्या pan मध्ये mango pulp आणि साखर हलकी गरम करा.

ते थोडं thick झालं की थंड होऊ द्या.

Set झालेल्या cheesecake वर हे topping spread करा.

वरून mango cubes टाका.

जर fancy mood असेल तर mint leaves किंवा white chocolate shavings पण add करू शकता.

असा हा भन्नाट cheesecake खाल्ल्यावर पहिल्या bite नंतर लोक २ सेकंद शांत होतात.

कारण त्यांना काय बोलावं तेच सुचत नाही 😄

* Biscuit base चा buttery crunch
* मध्ये creamy cheesecake layer
* आणि वर juicy mango topping

हे combination म्हणजे अवर्णनीय सुख आहे.

काही  खास टिप्स:- 

१. Cream cheese room temperature ला असू द्या

Cold cream cheese वापरलं तर lumps होतात.

२. Fresh mango pulp best

Market मधला ready pulp चालतो, पण ताज्या आंब्याचा पल्प नेहमीच उत्तम पर्याय. 

३. Patience ठेवा

Cheesecake घाईत cut केला तर तो mousse सारखा वाहतो.

४. Sweetness adjust करा

आंबा गोड असेल तर साखर कमी वापरा.

कदाचित पुढच्या वेळी तुम्ही हा cheesecake बनवाल तेव्हा आणि कुणीतरी पहिला bite घेऊन म्हणेल, 

“हे तू खरंच घरी बनवलंय?”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top