तांदुळाची खीर Recipe of Rice Kheer
साहित्य :
पाऊण वाटी तांदूळ, चार वाट्या दूध, दिड वाटी साखर, वेलदोडा पूड पाव चमचा
कृती :
तांदूळ धुवून अर्धवट बारीक करून घ्यावे.
तुपावर चांगले परतून घ्यावे. आणि नंतर पाणी घालून शिजवून घ्यावे.
दूध घालून चांगले उकळावे. सखर घालून आणखी एक उकळी आणावी.
दूध उकळतांना सतत हलवावे म्हणजे दूध फाटत नाही.
हि खीर तयार झाली कि गॅसवरून उतरवून वेलदोडा पूड घालावी.
वरून बदाम काप टाकून खीर सजवावी आणि सर्व्ह करावी.
खास टीप :
या खिरीमध्ये थोडी गार झाल्यावर शुद्ध गुलाब पाण्याचे दोन ते तीन थेंब टाकल्यास चांगला फ्लेवर येतो.
kheer indian recipe, tandool kheer recipe in marathi, marathi recipes, marathi sweet recipes, indian sweet recipes,