चविष्ट धिरडी | Dhirde Recipes

चविष्ट धिरडी Dhirde Recipes

ताकातलं धिरडं 

साहित्य : 

अडीच वाट्या कणिक, एक चमचा मिरच्यांचे वाटण, एक चमचा जिरेपूड, ताक गोड असल्यास दोन वाट्या आणि आंबट असल्यास एक ते सव्वा वाटी आणि मीठ 

कृती : 

कणकेत वाटलेल्या मिरच्या, जिरेपूड, ताक, मीठ आणि पाणी घालून पीठ सरबरीत भिजवून घ्यावे. 

तवा गरम झाल्यावर त्याला तेल लावून धिरडं घालावं. दोन्ही बाजूनी तेल सोडून धिरडी दोन्ही बाजूने खमंग शेकून घ्यावे. 

कोथिंबीर धिरडे  

साहित्य : 

एक वाटी ज्वारीचं पीठ, अर्धी वाटी बेसन, एक मोठा चमचा रवा, दोन वाट्या चिरलेली कोथिंबीर, अर्धी वाटी ताक, अर्धी वाटी पाणी, चवीला मीठ, लाल तिखट, अर्धा चमचा जिरे 

कृती :  

साहित्यात दिलेल्या सगळ्या गोष्टी एकजीव करावया आणि तवा चांगला तापवून तेल सोडून धिरडी घालावी. गरम गरम धिरडी दह्यासोबत सर्व्ह करावी. 

मुळ्याचे धिरडे 

साहित्य : 

एक वाटी तांदुळाचे पीठ,  एक मोठा चमचा बेसन, एक वाटी मुळ्याचा किस, एक वाटी पाणी, एक चमचा लिंबाचा रस, चवीला लाल तिखट, हिंग आणि मीठ 

कृती : 

सगळ्या गोष्टी एकजीव कराव्या. 

 तवा चांगला तापवून तेल सोडून धिरडी घालावी. गरम गरम धिरडी दह्यासोबत सर्व्ह करावी.   

dhirde recipes, dhirde recipe in marathi, marathi breakfast ideas, healthy recipes, धिरडे, easy breakfast, marathi breakfast, indian breakfast, चविष्ट धिरडी