उठा उठा चिऊताई | Utha utha chiutai lyrics

उठा उठा चिऊताई

चिऊताई सगळ्या बालगोपाळांची खास लाडकी. बालपणी पहिली ओळख हिच्यासोबत होते आणि आयुष्यभर आपल्याला हि मोहक चिऊताई, चिमणी म्हणून नाही तर, चिऊताई म्हणूनच लक्षात राहते. 

अश्या या चिऊताईचे हे खास बालगीत लिहले आहे आपले लाडके कुसुमाग्रज यांनी. 

उठा उठा चिऊताई utha utha chiutai marathi baalgeet lyrics utha utha chiutai marathi kavita lyrics in marathi

उठा उठा चिऊताई
सारीकडे उजाडले
डोळे तरी मिटलेले
अजुनही, अजुनही

सोनेरी हे दुत आले
घरटयाच्या दारापाशी
डोळयांवर झोप कशी
अजुनही, अजनुही?

लगबग पांखरे ही
गात गात गोड गाणे
टिपतात बघा दाणे
चोहींकडे, चोहींकडे,

झोपलेल्या अशा तुम्ही
आणायाचे मग कोणी
बाळासाठी चारापाणी
चिमुकल्या, चिमुकल्या?

बाळाचे मी घेतां नांव
जागी झाली चिऊताई
उडोनीया दुर जाई
भूर भूर, भूर भूर