तिळाच्या मऊ वड्या |Sankranti Recipes

तिळाच्या मऊ वड्या

साहित्य :

चार वाटी तीळ, दोन वाटी पिठीसाखर किंवा किसलेला गूळ, वेलची पूड, साजूक तूप, किसलेले खोबरे, दोन टे. स्पू. 

कृती :

तीळ स्वच्छ धुवून-वाळवून-खमंग भाजून घ्या, मिक्सरमधून फिरवून कूट करून घ्या. तिळाचे कूट, पिठीसाखर/गूळ व गरजेप्रमाणे तूप घाला. त्यात वेलची पूड घाला. एका ताटलीत तूप लावून वरील मिश्रण पसरवा. वरती खोबरे पसरवून हातांनी दापून घट्टसर करा. वड्या पाडा. या वड्या मऊ व खमंग लागतात.