चिकन नवाबी | Chicken Nawabi

चिकन नवाबी Chicken Nawabi Recipe

साहित्य : 

१ किलो चिकन, अर्धा किलो खवा, ८ कांदे, ५ टोमॅटो, १ वाटी काजू बदाम पेस्ट, १ वाटी दूध, प्रत्येकी पाव वाटी खसखस आणि अक्खा गरम मसाला, ४ चमचे आले लसूण पेस्ट, मिरच्या, मीठ आणि तूप 

कृती : 

कांदा लालसर परतावा. त्यावर खसखस आणि अक्खा गरम मसाला हि चांगला परतून घ्यावा. 

कांदा, खसखस आणि गरम मसाला थंड करून बारीक वाटावा. चिकनला हा मसाला लावून ३ तास मॅरीनेट करावे. 

हिरव्या मिरच्या आणि टोमॅटो बारीक चिरावे. 

एक पॅनमध्ये तूप तापवावे आणि त्यावर मिरच्या, आले लसूण पेस्ट परतून घ्यावी. वरून बदाम पेस्ट घालावी, चांगली परतली कि टोमॅटो घालावे आणि तेल सुटेपर्यंत परतून घ्यावे. 

या मिश्रणात चिकन घालावे आणि पुन्हा चांगले परतावे. दूध आणि खवा एकत्र करून आता तो या चिकनमध्ये घालावा. आणि झाकण ठेवून चिकन चांगले शिजवून घ्यावे. 

सर्व करतांना चिकन नवाबी मध्ये हिरव्या मिरचीचे बारीक काप आणि मीठ घालून चांगले मिक्स करून गरम गरम सर्व करावे. 

chicken nawabi, चिकन नवाबी, chicken recipes indian, chicken recipes marathi, chicken recipes for dinner, how to prepare chicken recipes, chicken recipes, how to make chicken recipes indian, chicken recipes for lunch indian, healthy chicken recipes, new chicken recipes, trending chicken recipe,