गुळाची पोळी |Gulachi poli

गुळाची पोळी Sankranti Recipes

साहित्य :

दोन वाटी मैदा, दोन टे. स्पू. कणीक, एक टे. स्पू. डाळीचे पीठ, चिमूटभर मीठ, दोन टे. स्पू. तेल किंवा तूप मोहनासाठी.

कृती :

वरील सर्व साहित्य एकत्र करून मऊसर भिजवून ठेवा.


सारणासाठी :

एक वाटी डाळीचे पीठ, अर्धी वाटी तीळ, एक टे. स्पू. खसखस, दोन वाटी किसलेले गूळ, वेलची, दोन टे. स्पू. पाणी.


कृती : डाळीचे पीठ कोरडेच भाजून घ्या, खसखस भाजून घ्या. तीळ खमंग भाजून मिक्सरमधून कूट करून घ्या. डाळीच्या पिठात तीळपूड-खसखस-वेलची पूड-गूळ एकत्र करून-थोडे पाणी घालून एकजीव करा. भिजवलेले पिठाच्या दोन लहान गोळ्या घेऊन-त्याच्या लहान-लहान पुर्‍या लाटून घ्या. दोन पुर्‍यांमध्ये सारणाची गोळी ठेवून पातळ गुळाची पोळी लाटून-तव्यावर थोडे तूप टाकून दोन्ही बाजूंनी लालसर भाजून घ्या. ही गुळाची पोळी गारदेखील छान लागते. पोळीवर घट्ट तूप ठेवून खायला द्या.