घरबसल्या पैसे कमवण्याचे 7 सोपे मार्ग (गृहिणींसाठी खास)
आजच्या काळात खर्च खूप वाढले आहेत. अशा वेळी अनेक गृहिणींना वाटतं — “आपणही काहीतरी कमावलं पाहिजे.”
पण घर आणि मुलांची जबाबदारी सांभाळून बाहेर काम करणं सगळ्यांना शक्य नसतं.
चांगली गोष्ट म्हणजे…
आज घरबसल्या पैसे कमावण्याचे खूप सोपे मार्ग उपलब्ध आहेत.
यापैकी तुम्ही अगदी घरातून आणि सहजपणे करू शकणाऱ्या काही पर्यायांची आपण माहिती घेऊया.
1. घरगुती पदार्थ विक्री
जर तुम्हाला स्वयंपाकाची आवड असेल, तर हा सर्वोत्तम पर्याय आहे.
लाडू, चिवडा, शेव, लोणचं, पापड, घरगुती मसाले यांची मागणी वर्षभर असते. आणि जर तुम्ही गुणवत्ता, दर्जा देऊ शकलात तर ग्राहकांचा विश्वास लवकर जिंकू शकतात. तुम्हाला जास्तीत जास्त ऑर्डर मिळण्यास सुरुवात होईल. कारण लोकांना आजकाल घरगुती पदार्थ जास्त आवडतात. आणि धावत्या रुटीनमुळे खूप जणांना ते घरी करणे शक्य नसते.
अश्या वेळेस तुमची उत्पादने चविष्ट, स्वच्छ पद्धतीने बनवलेली, दर्जेदार तरीही योग्य दरात असल्यास तुमच्या उत्पादनांना मागणी भरपूर असेल.
शिवाय यासाठी फार गुंतवणूक लागणार नाही. तुम्ही सुरुवातीला अगदी तुमच्या स्वयंपाकघरातूनच हा व्यवसाय सुरु करू शकतात.
2. WhatsApp Business वापरा
आजकाल जवळपास सगळ्यांकडे स्मार्ट फोन असतोच. अश्या वेळेस दिवसभर त्यावर विडिओ पाहून वेळ घालवण्यापेक्षा त्यावरून सुद्धा तुम्ही पैसे कमावू शकतात. तुमच्या मोबाईलवरूनच छोटा business सुरू करू शकता.
तुमचे जे हि उत्पादन असेल मग ते तुम्ही बनवलेले असो किंवा तुम्ही विकत घेऊन पुन्हा विकणार असाल तरीही त्याची जाहिरात तुम्ही व्हाट्सअँप वरून करू शकतात, ते हि फ्री.
त्यासाठी products चे चांगले फोटो काढून ते व्हाट्सअँप स्टेटसवर टाका. किंवा एक ग्रुप बनवून त्यात हि तुम्ही शेअर करू शकतात.
जस जसे तुमच्याकडे असलेल्या उत्पादनाची माहिती ग्राहकांपर्यंत पोहोचेल तश्या तुम्हाला घरबसल्या ऑर्डर्स मिळू शकतात.
हळू हळू हा बिझनेस तुम्ही वाढवू शकतात.
3. इंस्टाग्राम वर बिझनेस पेज बनवा
इंस्टाग्राम सुद्धा अत्यंत उपयुक्त आणि फ्री आहे. यावर तुम्ही तुमच्या प्रॉडक्ट, व्यवसाय यांची जाहिरात विनामूल्य तयार करून टाकू शकतात.
याद्वारे तुमची माहिती अधिक जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यास मदत होते. तुम्ही यावर सतत आणि योग्य पद्धतीने कामे केल्यास तुम्ही इंस्टाग्रामवर तुमचा brand तयार करू शकतात.
त्यासाठी तुमचे प्रॉडक्ट, सेवा, व्यवसाय यांची माहिती देणारे रोज छोटे videos टाका
ग्राहकांशी connect व्हा, त्यांच्या प्रश्नांची त्वरीत आणि योग्य उत्तरे द्या.
याद्वारे तुम्ही तुमचा बिझनेस उत्तम प्रकारे वाढवू शकाल.
4. YouTube channel सुरू करा
होय, अजून हि YouTube channel सुरु करणे हि फायद्याची आयडिया आहे. यासाठी तुमची आवड आणि स्किलनुसार एक टॉपिक निवडा.
जसे स्वयंपाक, छोट्या पण उपयुक्त घरगुती टिप्स, तुमचे डेली रुटीन असे कोणतेही टॉपिक, ज्यात तुमचा इंटरेस्ट असेल.
त्यावर छोटे छोटे विडिओ बनवून युट्युबवर टाकायला सुरुवात करा.
नियमितपणे रोज एक विडिओ तीन महिने टाकल्यास तुम्हाला लवकर यश मिळण्याची शक्यता आहे. हळूहळू income सुरू होतो.
5. ट्यूशन / क्लासेस
तुम्हाला एखादा विषय चांगला येत असेल तर:
लहान मुलांना शिकवा
किंवा
drawing / craft class घ्या
6. Online काम
आजकाल घरबसल्या online काम मिळू शकतं. ते तुम्ही मोबाइल किंवा लॅपटॉपवरून घरबसल्या करू शकतात.
data entry, content writing, सोशल मीडिया काम यासारख्या अनेक क्षेत्रात कामं मिळू शकतात.
फक्त यासाठीची कामे शोधताना कोणत्याही जाहिरातींवर भाळून जाऊ नये. पूर्ण खात्री झाली तरच काम घ्यावे.
7. Handmade products विक्री
आपल्याकडे वर्षभर अनेक सण असतात आणि सणांना साजरे करतांना वेगवेगळ्या वस्तू लागतच असतात जसे राखी, ग्रीटिंग कार्ड, डेकोरेशनच्या वस्तू, पणत्या, कंदील
या वस्तू तुम्ही स्वतः घरी बनवून त्याची सुद्धा विक्री करून पैसे कमावू शकतात.
सुरुवात छोटी असली तरी चालेल… पण सुरुवात करा.
कारण “थेंबे थेंबे तळे साचते”
तेव्हा या पर्यायांपकी तुम्हाला जो आवडतो आणि सोयीचा वाटतो आहे त्यावर नक्की विचार करा आणि कामाला लागा.
घरबसल्या पैसे कमवण्याचे सोपे मार्ग, घरातून पैसे कसे कमवावे, boli marathi, marathi, earning ideas for women from home, earning ideas in marathi,