उन्हाळ्यात शरीर थंड ठेवण्यासाठी 10 घरगुती उपाय

उन्हाळ्यात शरीर थंड ठेवण्यासाठी 10 घरगुती उपाय

उन्हाळा सुरू झाला की सगळ्यांचीच अवस्था होते — “काहीतरी थंड मिळालं पाहिजे!”

गरमीमुळे थकवा, डोकेदुखी, चिडचिड… हे सगळं होतं.पण काळजी करू नका…

आपल्या घरातच त्यावर सोपे उपाय आहेत. त्याविषयी आज माहिती घेऊया. 

 1. लिंबू सरबत

घरातल्या सामानाने हे पटकन बनवता येते. लिंबाचा रस, साखर, किंचित मीठ आणि पाणी बस एवढ्याच साहित्यात अतिशय रुचकर आणि उन्हाळ्यासाठी थंडावा देणारे हे लिंबू सरबत 

खूप कमी वेळात बनवता येते. हे सरबत शरीराला थंडावा देते. ऊर्जा वाढवते. 

आवडत असल्यास किंचित आल्याचा रस हि यात घालू शकतात. याने चव वाढतेच शिवाय उन्हामुळे येणारी अरुची दूर होते. 

2. ताक 

दुपारी एक ग्लास ताक पिणं खूप फायदेशीर आहे. त्यात घरी लावलेले दही असले तर ताक आणखीनच पौष्टिक होते. 

ताकामुळे शरीरातील दाह कमी होतो. तेव्हा उन्हाचे परिणाम कमी करण्यासाठी ताकाचा समावेश तुमच्या आहारात नक्की करा. 

3. कलिंगड 

उन्हाळ्यात मिळणारे अतिशय रुचकर फळ. यात गोडवा तर असतोच शिवाय यात पाणी जास्त असतं त्यामुळे शरीर hydrated राहतं. 

4. काकडी 

उन्हाचा दाह कमी करण्यासाठी स्वस्त आणि मस्त उपाय. काकडी सगळीकडे मुबलक प्रमाणात उपलब्ध असते. यात पाण्याचे प्रमाण भरपूर असते. त्यामुळे शरीर थंड ठेवण्यासाठी खूप उपयोगी

असते. सलाड, कोशिंबीर किंवा नुसतीच कापून जरा मीठ लावून हि काकडी नक्की खाल्ली पाहिजे. 

5. कांदा 

ऊन लागण्यापासून वाचण्यासाठी कांदा उन्हाळ्यात नक्की खाल्ला पाहिजे. शरीरात ताप असेल तर कांद्याचा रस हि तळहात तळपाय यांना चोळला जातो. 

कांदा थंड असतो. त्यामुळे उन्हाळ्यात हा अनेक प्रकारे खाल्ला गेला पाहिजे. 

6. नारळ पाणी

यामुळे शरीराला instant energy मिळते. शिवाय निसर्गाने अतिशय विचारपूर्वक या फळाची निर्मिती केली आहे. उन्हामुळे शरीरातून जे क्षार कमी होतात, एका नारळ पाण्याने ते सगळे भरून 

निघू शकतात. त्यामुळे बाजरातील साखर मिश्रित काहीही थंड पेय पिण्यापेक्षा नारळ पाणी प्यावे. 

7. पाणी भरपूर प्या

दिवसभरात 8-10 ग्लास पाणी प्या. उन्हामुळे शरीरातील पाण्याचा ऱ्हास घामावाटे सतत होत असतो. त्यामुळे थकवा, चक्कर जाणवू शकते. हे टाळण्यासाठी पाणी भरपूर पिले पाहिजे. 

हे पाणी स्वच्छ, नैसर्गिकरित्या जसे माठाद्वारे थंड केलेले असावे. 

summer tips in marathi
summer tips in marathi

8. हलके कपडे घाला

उन्हात जाताना घट्ट कपडे वापरू नये. कपडे सुटसुटीत, कॉटनचे असावे. ज्यामुळे हवा खेळती राहील. 

9. उन्हात जाताना टोपी, छत्रीचा वापर करावा

दुपारच्या वेळेत बाहेर जाणं कमी करा आणि जायचे असेलच तर टोपी, रुमाल, छत्री यांचा वापर आवर्जून करावा. 

सतत ऊन डोक्यावर लागत राहिले तर उष्माघाताची भीती असते म्हणून डोके झाकण्याची काळजी घ्यावी. 

10. सब्जाच्या बियांचा आहारात समावेश करा 

सब्जाच्या बिया गुणधर्माने थंड असतात. पाण्यात भिजवून ठेवल्या कि त्यांच्या भोवती जेल सारखे आवरण तयार होते. यांचा वापर भिजवूनच करावा. 

सरबत, कोशिंबीर, रायता अश्या अनेक गोष्टींमध्ये टाकून या भिजवलेल्या बियांचे सेवन करता येते. 

थोडक्यात काय तर 

उन्हाळा थांबवता येत नाही…

पण स्वतःची काळजी घेता येते.

तेव्हा या उन्हाळ्यात स्वतःची आणि तुमच्या कुटुंबीयांची काळजी नक्की घ्या. 

1 thought on “उन्हाळ्यात शरीर थंड ठेवण्यासाठी 10 घरगुती उपाय”

Comments are closed.

Scroll to Top