उन्हाळ्याच्या सुट्टीत मुलांना गुंतवून ठेवण्यासाठी 10 मजेदार खेळ
उन्हाळ्याची सुट्टी म्हणजे मुलांसाठी आनंदाची पर्वणी… पण पालकांसाठी मात्र थोडं टेन्शन!
कारण सुट्टी असली कि दिवसभर मुले आपल्या मागे फिरत “मला बोर होतंय, काय करू?” असे विचारत असतात.
आणि आजकाल त्यांना आपण काही उत्तर दिले नाही कि त्यांचे उत्तर तयारच असते, “मग मला मोबाईल दे”
पण असे काही करणे आपल्याला पटत नाही. मोबाईल देऊन देऊन किती वेळ देणार शेवटी?
“त्यांना काहीतरी उपयोगी आणि मजेदार खेळात कसं गुंतवून ठेवायचं?” – हे प्रश्न प्रत्येक आई-बाबांच्या मनात येतात.
आजकाल मुलं पटकन मोबाईलकडे आकर्षित होतात. पण खरं सांगायचं तर mobile शिवाय मुलांना कसे आणि काय खेळावे हे जर एकदा कळलं, तर त्यांचा आनंदही वाढतो आणि त्यांची क्रिएटिव्हिटीही!
माझ्या शेजारी राहणारी क्रांती एकदा सांगत होती, “माझा मुलगा आवीर सुट्टीत दिवसभर मोबाईलवर असायचा… पण मी काही घरगुती खेळ सुरू केले आणि आता तो स्वतःच मला म्हणतो – ‘आई, आज आपण कोणता गेम खेळायचा?’”
म्हणूनच आज आपण पाहणार आहोत असे 10 मजेदार आणि सोपे खेळ, जे तुम्ही घरीच मुलांसोबत खेळू शकता.
1. खजिन्याचा शोध (Treasure Hunt)
हा खेळ मुलांना खूप आवडतो!
कसा खेळायचा:
* घरात वेगवेगळ्या ठिकाणी छोटे क्लू (चिठ्ठ्या) लपवा
* प्रत्येक क्लू पुढच्या ठिकाणी नेईल
* शेवटी छोटस गिफ्ट ठेवा
फायदा:
* मुलांची विचारशक्ती वाढते
- त्यांना एक्साइटमेंट मिळते
* वेळ मजेत जातो
* त्याची तर्क करण्याची क्षमता वाढते
2. रंग ओळखा (Color Hunt)
कसा खेळायचा:
* एक रंग सांगा (उदा. लाल)
* मुलांनी घरात त्या रंगाच्या वस्तू शोधायच्या
उदाहरण:
“चल आरव, आज आपण ‘पिवळा’ रंग शोधूया!”
फायदा:
* निरीक्षणशक्ती वाढते
* लहान मुलांसाठी खूप उपयोगी
* रंगांची छान प्रकारे ओळख होते
3. घरगुती कॅम्पिंग
कसा खेळायचा:
* चादर, उशा वापरून छोटं टेंट बनवा
* त्यात गोष्टी सांगा, स्नॅक्स खा
* घरातच मस्त कॅम्प एन्जॉय करा
फायदा:
* मुलांना adventure feel येतो
* स्क्रीनपासून दूर राहतात
4. नाटक-नाटक (Role Play Game)
कसा खेळायचा:
* “शिक्षक”, “डॉक्टर”, “भाजीवाला” असे रोल द्या
* मुलं स्वतः अभिनय करतात
फायदा:
* कल्पनाशक्ती वाढते
* संवाद कौशल्य सुधारते
* खेळता खेळता त्यांना भरपूर शिकायला मिळते
5. पझल टाइम
कसा खेळायचा:
* पझल्स किंवा ब्लॉक्स द्या
* चित्र पूर्ण करायला सांगा
फायदा:
* मेंदूचा विकास
* लक्ष केंद्रीत राहते

6. घरातल्या घरात अडथळा शर्यत (Obstacle Race)
कसा खेळायचा:
* उशा, खुर्च्या वापरून छोटा ट्रॅक बनवा
* मुलांनी त्यातून जाऊन फिनिश लाईन गाठायची
फायदा:
* शारीरिक हालचाल वाढते
* मजा + व्यायाम दोन्ही सोबत होतात
7. स्टॅच्यू (Freeze Game)
कसा खेळायचा:
* मुलांच्या आवडीचे गाणं लावा
* गाणे मधेच अचानक थांबवायचे
* गाणं थांबलं की मुलांनी स्टॅच्यू व्हायचं
फायदा:
* खूप मजा येते
* एकाग्रता वाढते
* पेशन्स वाढतो
8. क्राफ्ट टाइम
कसा खेळायचा:
* कागद, गोंद, रंग वापरून काहीतरी बनवा
* उदा. फुलं, कार्ड्स
फायदा:
* creativity वाढते
* स्क्रीन टाइम कमी होतो
9. गोष्टी सांगण्याचा खेळ
कसा खेळायचा:
* एक वाक्य तुम्ही सुरू करा
* पुढे मुलांनी गोष्ट वाढवायची
* मुलं जर अडली तरी आपण त्यांना मदत करत एक एक वाक्य सांगायचे
* एक दोनदा प्रयत्न केला कि मुलं शिकतात आणि त्यांना या खेळात मज्जा यायला लागते.
उदाहरण:
तुम्ही असे एखादे वाक्य सांगून सुरुवात करू शकतात,
“एकदा गंपू नावाचा हत्ती समुद्रावर गेला…”
फायदा:
* भाषा कौशल्य सुधारते
* मुलांची कल्पनाशक्ती वाढते
* या खेळातून मुले भरपूर शिकू शकतात
10. छोटा शेफ (Kids Cooking Activity)
कसा खेळायचा:
* सोपे पदार्थ बनवायला शिकवा, तुम्ही त्याच्याशेजारी उभे राहून थोडी थोडी मदत करा
* चिरणे वगैरे मुलांना करू देऊ नका, ते तुम्ही करून द्या. त्यांना मिक्स करण्याची, सजवण्याची कामे सांगा
* उदा. सॅंडविच, लिंबूपाणी
* मुले थोडी मोठी ७-८ वर्षाची असल्यास मुलांसाठी खास न लागणाऱ्या सुऱ्या मिळतात त्या वापरून तुम्ही त्यांना भाज्या, सलाड कापणे शिकवू शकतात.
फायदा:
* नवीन चवींशी ओळख होते
* पदार्थ करून पाहिल्यावर त्यामागची मेहनत लक्षात येते आणि मुले खाण्यास नकार देणे कमी करतात
* आत्मविश्वास वाढतो
* नवीन कौशल्य शिकतात
महत्वाच्या टिप्स (पालकांसाठी)
दररोज एक नवीन activity ठेवा
मुलांना जबरदस्ती करू नका – मजेत खेळू द्या
थोडं कौतुक करा – “वा! खूप छान केलंस!”
स्क्रीन टाइम हळूहळू कमी करा
उन्हाळ्याची सुट्टी ही फक्त वेळ घालवण्याची नाही, तर मुलांसोबत नातं घट्ट करण्याची संधी आहे
आजपासून फक्त 1 तास जरी तुम्ही मुलांसोबत खेळलात ना, तर ते मोबाईलपेक्षा जास्त आनंदी होतील आणि तुम्हालाही खूप छान वाटेल
जर तुम्हाला असेच मुलांसाठी घरगुती खेळ आणि उपयुक्त टिप्स आवडत असतील, तर हा लेख नक्की शेअर करा – कदाचित एखाद्या आईला याचा खूप उपयोग होईल.
सुट्टीत मुलांसाठी मजेदार खेळ, summer activities for kids, boli marathi, उन्हाळ्याच्या सुट्टीत मुलांना गुंतवून ठेवण्यासाठी 10 मजेदार खेळ, मुलांसाठी घरगुती खेळ