उन्हाळ्यासाठी 5 सोप्या आणि हेल्दी आईस्क्रीम रेसिपी (घरच्या घरी)

 उन्हाळ्यासाठी 5 सोप्या आणि हेल्दी आईस्क्रीम रेसिपी (घरच्या घरी)

उन्हाळा आला की मुलांची एकच मागणी सुरू होते -“आई, मला आईस्क्रीम हवंय!” 

माझ्या शेजारी राहणारी सायली तर रोज संध्याकाळी आईकडे हट्ट करायची, “आई, आज कोणतं आईस्क्रीम?”

पण रोज बाहेरचं आईस्क्रीम देणं योग्य आहे का? नाही ना!

ते कधीचे बनवलेले असते, शिवाय त्यात काय काय टाकले आहे हे आपल्याला माहित नसते.

घरीच जर हेल्दी पद्धतीने आईस्क्रीम बनवणे एवढे सोपे असेल तर बाहेरचे  आईस्क्रीम आणायचे कशाला? 

म्हणूनच आज आपण पाहणार आहोत homemade ice cream recipes in marathi
👉 अगदी सोप्या,
👉 बिना मशीन,
👉 आणि मुलांसाठी हेल्दी!

या रेसिपीज इतक्या सोप्या आहेत की तुम्ही आणि तुमची मुलं दोघं मिळून बनवू शकता 😊

 1. केळं-चॉकलेट आईस्क्रीम (Banana Chocolate Ice Cream)

लागणारे साहित्य:

* 2 पिकलेली केळी
* 1 चमचा कोको पावडर
* 1 चमचा मध

कृती:

1. केळी सोलून छोटे तुकडे करा
2. 2-3 तास फ्रीजरमध्ये ठेवा
3. नंतर मिक्सरमध्ये केळी + कोको पावडर + मध घालून ब्लेंड करा
4. पुन्हा 1 तास फ्रीज करा

ज्यांना चॉकलेट  आईस्क्रीम आवडतं त्यांच्यासाठी हा उत्तम पर्याय आहे. 

फायदा:

* साखर कमी

* पूर्ण नैसर्गिक

* चव अगदी बाहेरच्या चॉकोलेट  आईस्क्रीमसारखी 

2. स्ट्रॉबेरी दही आईस्क्रीम

साहित्य:

* 1 कप स्ट्रॉबेरी
* 1 कप दही
* 2 चमचे मध

 कृती:

1. स्ट्रॉबेरी बारीक करून घ्या
2. दही आणि मध मिसळा
3. मोल्डमध्ये घालून फ्रीजरमध्ये ठेवा

टिप:

 हे आईस्क्रीम छोट्या कुल्फी साच्यात किंवा छोट्या कपात सेट केलं तर मुलांना जास्त आवडतं

 फायदा:

* प्रोटीन + व्हिटॅमिन्स
* digestion साठी चांगलं

* फळं आणि दही या निम्मिताने मुलांच्या पोटात जाते 

healthy ice cream recipes in marathi boli marathi
healthy ice cream recipes in marathi

 3. आंबा मिल्क आईस्क्रीम (Mango Ice Cream)

साहित्य:

* 1 कप आंब्याचा रस
* 1/2 कप दूध
* 1 चमचा मध

 कृती:

1. सगळं मिक्स करून घ्या
2. फ्रीजरमध्ये 5-6 तास ठेवा

माझा अनुभव:

कालच मी आईस्क्रीम करून बघितले तेव्हा माझी मुलगी म्हणाली,

“आई, हे तर दुकानातल्या आईस्क्रीमपेक्षा जास्त टेस्टी आहे!” 

फायदा:

* seasonal fruit खाणे होतात 

* मुलांचा फेवरेट फ्लेवर 

4. खजूर-ड्रायफ्रूट आईस्क्रीम

साहित्य:

* 5-6 खजूर
* बदाम, काजू
* 1 कप दूध

 कृती:

1. खजूर 10 मिनिटं भिजवा
2. सगळं मिक्सरमध्ये ब्लेंड करा
3. फ्रीजमध्ये सेट करा

फायदा:

* आयर्न भरपूर

* पूर्ण हेल्दी

* जास्तीची साखर टाकावी लागत नाही , खजुरामुळे नैसर्गिक गोडी येते 

5. कलिंगड आईस्क्रीम (Watermelon Ice Pops)

 साहित्य:

* कलिंगडाचे तुकडे
* थोडासा लिंबाचा रस

 कृती:

1. कलिंगड मिक्सरमध्ये फिरवा
2. थोडासा लिंबू घाला
3. मोल्डमध्ये घालून फ्रीज करा

 फायदा:

* शरीर थंड ठेवतं
* hydration वाढवतं

 बिना मशीन आईस्क्रीम कसे बनवावे?

खूप जणी विचारतात – 
“आईस्क्रीम मशीन नाही, मग कसं बनवायचं?”

 सोपं आहे!

✔️ लक्षात ठेवा:

* मिक्सर पुरेसा आहे
* 2-3 वेळा ढवळलं तर texture चांगलं येतं
* airtight डब्यात ठेवा

 पालकांसाठी महत्वाचे टिप्स

✔️ मुलांना जास्त साखर देणे टाळा
✔️ नैसर्गिक फळांचा वापर करा
✔️ मुलांना आईस्क्रीम बनवण्यात सहभागी करून घ्या

✔️ लहान portions द्या

एकदा सायली आणि तिची आई दोघी मिळून आईस्क्रीम बनवत होत्या.
सायलीने स्वतः मोल्डमध्ये मिश्रण ओतलं…आणि 2 तासांनी ती म्हणाली,
“आई, हे मी बनवलंय! किती छान झालंय”

एखादा पदार्थ स्वतःच्या हाताने करून बघणे हा मुलांसाठी खूप आनंददायी अनुभव असतो. त्या आनंदाची तुलना कोणत्याही दुकानातल्या आईस्क्रीमशी होऊ शकत नाही

ही homemade ice cream recipes in marathi तुम्हाला नक्की उपयोगी पडतील.

आजच एक रेसिपी ट्राय करा…
आणि तुमच्या मुलाच्या चेहऱ्यावरचा आनंद बघा 😊

जर हा लेख आवडला असेल, तर इतर आईंसोबत नक्की शेअर करा.

Scroll to Top