पनीर जिलबी – घरच्या घरी बनवा
तुम्हाला गोड पदार्थांमध्ये काय आवडतं?
आपल्याकडे गोड पदार्थांमध्ये इतकी विविधता असते कि विचारता सोय नाही. पण तरीही जिलबी मनापासून आवडणारे बरेच लोकं आहेत, बरोबर ना?
तुम्ही कधी “पनीर जिलबी” चाखली आहे का?
पारंपरिक जिलबीपेक्षा ही थोडी वेगळी, मऊसर आणि आतून रसाळ असते. बाहेरून हलकी कुरकुरीत आणि आतून स्पंजी टेक्स्चर – पनीर जिलबी म्हणजे एकदम खास ट्रीट!
आज आपण अगदी सोप्या पद्धतीने, घरच्या घरी हलवाई स्टाईल पनीर जिलबी कशी बनवायची ते पाहूया.
पनीर जिलबीचे वैशिष्ट्य
पनीर जिलबीची खासियत म्हणजे तिच वेगळ टेक्सचर . बेसन किंवा मैद्याऐवजी पनीर वापरल्यामुळे ही जिलबी जास्त मऊ आणि रसाळ होते. साखरेच्या पाकात भिजल्यावर ती तोंडात टाकताच विरघळते आणि प्रत्येक घासात गोडवा भरतो.
साहित्य (Ingredients)
जिलबीसाठी:
* 1 कप ताजं पनीर
* 2 टेबलस्पून मैदा
* 1 टेबलस्पून कॉर्नफ्लोअर
* 1/4 टीस्पून बेकिंग सोडा
* 2-3 टेबलस्पून दही
* पाणी (आवश्यकतेनुसार)
पाकासाठी:
* 1 कप साखर
* 1/2 कप पाणी
* 1/2 टीस्पून वेलची पूड
* काही केशर धागे (ऐच्छिक)
तळण्यासाठी:
तूप किंवा तेल

कृती (Step-by-Step Recipe)
1. पनीरचं पीठ तयार करणे
सर्वप्रथम पनीर चांगलं मऊ करून घ्या (मॅश करा). त्यात मैदा, कॉर्नफ्लोअर, बेकिंग सोडा आणि दही घाला.
हे सगळं एकत्र करून एकसारखं गुळगुळीत पीठ तयार करा. आवश्यक असल्यास थोडं पाणी घाला.
पीठ खूप घट्ट किंवा खूप पातळ नसावं – मध्यम consistency असावी.
2. साखरेचा पाक तयार करणे
एका पॅनमध्ये साखर आणि पाणी घालून गरम करा.
साखर वितळली की त्यात वेलची पूड आणि केशर घाला.
पाक एकतारी (one string consistency) झाला की गॅस बंद करा.
पाक खूप घट्ट नको, नाहीतर जिलबी नीट भिजणार नाही.
3. जिलबी तयार करणे
तयार पीठ एका पाईपिंग बॅगमध्ये किंवा प्लास्टिकच्या पिशवीत भरा.
कढईत तूप किंवा तेल गरम करा.
आता गरम तेलात गोल-गोल फिरवत जिलबीचा आकार द्या.
मध्यम आचेवर जिलबी दोन्ही बाजूंनी सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळा.
4. पाकात भिजवणे
तळलेल्या गरम जिलबी थेट गरम किंवा कोमट पाकात घाला.
1-2 मिनिटे भिजू द्या, म्हणजे त्या चांगल्या रसाळ होतील.
5. सर्व्ह करणे
गरमागरम पनीर जिलबी प्लेटमध्ये काढा. वरून थोडे पिस्ता किंवा बदाम घालून सजवा.
काही खास टिप्स
- पीठ जास्त वेळ ठेऊ नका – लगेच जिलबी बनवा
- पनीर ताजं आणि मऊ असलं पाहिजे – त्यामुळे जिलबी छान मऊ होतात
- तेल खूप गरम नसावं – नाहीतर जिलबी आतून कच्ची राहते
- पाक आणि जिलबी दोन्ही गरम असतील तर चांगला रस शोषला जातो
पनीर जिलबी ही पारंपरिक मिठाईला दिलेला एक भन्नाट ट्विस्ट आहे. बनवायला सोपी आणि खायला अप्रतिम – एकदा नक्की करून पाहा.
तुमच्या घरच्यांना आणि पाहुण्यांना ही रेसिपी नक्की आवडेल.
“बोली मराठी” – माहिती आपल्या भाषेत!
पनीर जिलबी, paneer jilebi, paneer jilbi, paneer jalebi recipe, jalebi recipe in marathi, boli marathi