प्रभाती सूर नभी रंगती (lyrics in marathi)
सकाळी सकाळी मंद गार हवा, त्यात मिसळलेला फुलांचा सुगंध आणि कानी पडणारे भक्तिगीतं, प्रभात गीतं यांचे स्वर! सुंदर सकाळ आणखी काय वर्णावी?
यात हे प्रभातगीत तर अगदी सगळ्यांच्या ओठी बसलेले, तुम्हाला हि अनेकदा हे गुणगुणावे वाटत असेल त्यासाठी त्याचे बोल इथे देत आहोत.

गीत – रमेश अणावकर
संगीत – वसंत प्रभू
स्वर – आशा भोसले
प्रभाती सूर नभी रंगती, दशदिशा भूपाळी म्हणती
पानोपानी अमृत शिंपीत, उषा हासरी हसते धुंदीत
जागी होऊन फुले सुगंधित, तालावर डोलती
कृषीवलाची हाक ऐकूनी, मोट धावते शेतामधूनी
पक्षी अपुल्या मधूर स्वरांनी, स्वरांत स्वर मिळिवती
प्रसन्न वदनी सुहासिनी कुणी, सडे शिंपीती मृदुल करांनी
श्रीविष्णुचे नाम स्मरुनी, तार कुणी छेडीती
प्रभाती सूर नभी रंगती, दशदिशा भूपाळी म्हणती
प्रभाती सूर नभी रंगती, प्रभाती सूर नभी रंगती lyrics, boli marathi, lyrics in marathi,
Pingback: तुझ्या कांतीसम रक्तपताका lyrics - बोली मराठी