चटपटीत हरबरा उसळ
हरबरा हा तसा आपल्या नेहमीच्या जेवणातला पदार्थ. पण नेहमी या हरबऱ्याची एकाच प्रकारची उसळ केली तर करणाऱ्यालाही कंटाळा येतो आणि खाणाऱ्यालाही.
म्हणून हरबऱ्याची उसळ एकदा या पद्धतीने करून बघा. तुम्हाला नक्की आवडेल.
हरबरा उसळ
साहित्य :
हरबरे दिड वाटी, दोन चमचे काळा मसाला, दोन चमचे कच्चा मसाला, लाल तिखट एक मोठा चमचा, मीठ, पाव वाटी तेल, फोडणीसाठी कढीपत्ता, कोथिंबीर, सुके किंवा ओले खोबरे
कृती :
हरबरे चांगले धुवून घ्यावे आणि रात्रभर भिजत घालावे. दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा पाण्याने धुवून घ्यावे.
तेलात मोहरी, हिंग, हळद, कढीपत्ता घालून फोडणी करावी आणि त्यात हरबरे टाकावे.
दोन वाट्या पाणी गरम करून घालावे. उसळ शिजून चांगली मऊ होऊ द्यावी. नंतर त्यात काळा मसाला, कच्चा मसाला, तिखट, मीठ आणि किंचित गुळ घालावा.
कच्चा मसाला नसल्यास मोठा चमचा जिरे आणि सुके खोबरे कुटून घालावे.
उसळ चांगली शिजल्यावर वरून ओले किंवा सुके खोबरे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी.
हरबरा उसळ, boli marathi, chickpeas, harbara usal recipe in marathi, marathi recipes
हरबरा खाण्याचे फायदे काय आहेत?
हरबऱ्यामधे प्रथिने, फायबर आणि खनिजे असतात. हरबरे दहा बारा तास भिजवून ते मोड आणून खाल्ल्यास त्याचे जास्त फायदे मिळतात. हे हरबरे वाफवून किंवा भाजी उसळीच्या स्वरूपात खाल्ले जाऊ शकतात. हरबऱ्यात व्हिटॅमीन बी सुद्धा भरपूर असते. याने हाडे आणि स्नायू मजबूत होण्यास मदत होते.
डायबेटीसचे रुग्ण हरबरा खाऊ शकतात का?
हो नक्कीच, हरभऱ्याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्याने मधुमेह अर्थात डायबेटीसचे रुग्ण नक्कीच याचा वापर आहारात करू शकतात.
यात प्रथिनांचे प्रमाण हि चांगले असल्याने, हरबरा खाल्ला कि भरपूर वेळ पोट भरल्यासारखे राहते, सारखी भूक लागत नाही म्हणून याचा वापर वजन नियंत्रणात आणण्यासाठी सुद्धा होतो.