भरली भाकरी (Bharli Bhakari)
भाकरी म्हटली कि अनेक जण खायला नाखूष असतात. पण आज एक भन्नाट भाकरीची रेसिपी बोली मराठी द्वारे तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.
भाकरी नको नको म्हणणारेसुद्धा एकदा हि भाकरी नक्की खाऊन बघतील. हि भाकरी करायला सोपी, पोटभरीची आणि शिवाय पौष्टिकसुद्धा आहे.
साहित्य:
ज्वारीच पीठ, शेंगदाणा कूट, गोडा मसाला, मीठ, कोथिंबीर, चिंचेचा कोळ, सुक्या खोबऱ्याचा किस भाजून आणि हलक्या हाताने चुरून, एक कांदा, दोन चमचे तेल आणि फोडणीसाठी हिंग, जिरं, मोहरी, हळद

कृती:
ज्वारीच्या पिठाची भाकरी करून घ्यावी. गरम असतानाच एका बाजूला थोडा बंद ठेवून बाकीचा पापुद्रा उघडावा.
भाकरीवर आधी चिंचेचा कोळ चमचाभर सगळीकडे लावून घ्यावा. त्यावर चवीनुसार तिखट, मीठ, गोडा मसाला, बारीक चिरलेली कोथिंबीर, दाण्याचा कूट, खोबऱ्याचा किस, बारीक चिरलेला कांदा पसरून घ्यावा.
तेल गरम करून हिंग, जिरे, मोहरी आणि चिमूटभर हळद टाकून फोडणी करून घ्यावी.
हि फोडणी भाकरीवर सगळीकडे नीट लागेल अशी ओतावी.
बाजूचा पापुद्रा भाकरीवर घट्ट दाबून बसवावा.
पिकनिकसाठी न्यायलासुद्धा उत्तम. पोटभरीचे आणि पौष्टिक खाणे.
भरली भाकरी, boli marathi, recipes in marathi, healthy recipes in marathi, dinner recipes,
हे हि वाचा:
प्रवासी पिठलं – अतिशय रुचकर पदार्थ