प्रवासी पिठलं | Pithla Recipe

प्रवासी पिठलं

साहित्य : 

दिड वाटी डाळीचे पीठ, तीन वाट्या पाणी, एक कांदा बारीक चिरून, १०-१२ लसूण पाकळ्या, तिखट, मीठ, एक चमचा जिरे, हळद, तेल 

कृती : 

प्रथम पाण्यात डाळीचे पीठ, तिखट, मीठ, जिरे, थोडी हळद घालून कालवून घ्या. 

लोखंडी कढईमधे पाव वाटी तेल टाकून मोहरी, हिंग आणि हळद घालून फोडणी करावी. 

त्यात कांदा आणि लसूण परतून घ्यावे.  नंतर त्यात कालवलेले पीठ हळू हळू ओतावे. 

चांगले हलवून मध्यम गॅसवर चांगले शिजू द्यावे. 

हे पिठले कांदा न टाकल्यास केल्यास जास्त टिकते. आणि प्रवासात नेण्यास चांगला पर्याय होतो. 

पिठलं, pithla recipe, pithla recipe in marathi, food for travelling, pithla bhakari,