खमंग काकडी

खमंग काकडी साहित्य :  काकडी पाव किलो, दाण्याचे कूट अर्धी वाटी, गोड दही, एक छोटा चमचा मीठ, मोठा चमचा साखर, अर्धे लिंबू, फोडणीसाठी एक चमचा तूप आणि दोन हिरव्या मिरच्या  कृती :  काकडीची साले काढून घ्यावी आणि काकडी किसून त्याचे पाणी पिळून काढून टाकावे. त्यात दाण्याचे कूट, मीठ, साखर, कोथिंबीर टाकून चांगले मिक्स करावे. दह्यातले … Read more

केळीची कोशिंबीर 

केळीची कोशिंबीर  साहित्य :  पिकलेली चार केळी, एक मोठा चमचा दाण्याचे कूट, एक चमचा साखर, अर्धा छोटा चमचा मीठ, अर्धी वाटी गोड दही  कृती : केळीचे बारीक तुकडे करावे. त्यात साहित्यात दिलेले सर्व साहित्य टाकून चांगले मिक्स करावे.  * हि कोशिंबीर जास्त वेळ ठेवायची असल्यास फ्रिजमध्ये ठेवावी म्हणजे केळी काळी पडत नाहीत.  खास टिप्स :  … Read more

तळणीचे मोदक 

taniche modak recipe in marathi

तळणीचे मोदक  सारणाचे साहित्य :  दोन वाट्या किसलेले खोबरे, अर्धा वाटी खसखस, दोन खारकांची जाडसर पूड, पाव वाटी काजूचे तुकडे, दोन चमचे बेदाणे, अर्धा चमचा वेलदोडा पूड, दोन वाट्या पिठीसाखर  कृती :  सारण तयार करण्यासाठी सुके खोबरे भाजून हाताने कुस्करून घ्यावे आणि किंचित गार झाल्यावर सारणाचे इतर साहित्य त्यात मिक्स करून ठेवावे.  कव्हरसाठी साहित्य :  दोन … Read more

चॉकोलेट मोदक 

चॉकोलेट मोदक  साहित्य:  ड्रिंकिंग चॉकोलेट पाव वाटी, कोको पावडर तीन ते चार चमचे, रवा भाजून पाव वाटी, डेसिकेट कोकोनट चार ते पाच चमचे, साखर पाव वाटी, चॉकोलेट चिप्स सजावटीसाठी  कृती :  साखरेचा पाक करून घ्या. एका कढईमध्ये भाजलेला रवा, साखरेचा पाक, चॉकलेट पावडर, कोको पावडर, डेसिकेट कोकोनट सर्व मिक्स करून घ्या.  त्याचा घट्ट गोळा करावा.  … Read more

उकडीचे मोदक 

ukdiche modak recipe marathi

उकडीचे मोदक  मोदकाच्या उकडीचे सारण  साहित्य :  दोन मोठे नारळ, अडीच वाट्या गुळ, पाऊण वाटी साखर, पाव चमचा वेलदोडा पूड, पाव चमचा जायफळ पूड  सारणाची कृती :  नारळ खोवून त्यात गुळ आणि साखर घालून करंज्यांना शिजवतो असे सैलसर मिश्रण शिजवावे. त्यात जायफळ, वेलदोड्याची पूड घालून सारखे करून ठेवावे. मिश्रण आदल्या रात्री करून ठेवल्यास चांगले होते.  उकड  … Read more

पुरण पोळी | Puran Poli Recipe in Marathi

puran poli recipe in marathi bolimarathi.com

पुरण पोळी  साहित्य :  तीन वाट्या हरबरा डाळ, दोन वाट्या चिरलेला गुळ, एक वाटी साखर, अर्धा चमचा जायफळ पूड, पाव चमचा वेलदोडा पूड, सात ते आठ वाट्या पाणी, दिड भांडे चाळलेली कणिक, अर्धी वाटी मैदा, अर्धी वाटी तेल, पोळी लाटण्यासाठी तांदुळाची पिठी  कृती :  प्रथम पाण्याचे आधण ठेवावे. उकळी फुटली कि डाळ धुवून त्यात टाका. पाच मिनिटांनी … Read more

तिखट मिठाचे दाणे 

tikhat mithache daane recipe in marathi

तिखट मिठाचे दाणे  साहित्य :  दोन वाट्या भाजलेले दाणे, अर्धा चमचा तूप, तिखट, अर्धा चमचा मीठ, जिरेपूड, मिरेपूड  कृती :  तुपात जिरेपूड आणि मिरेपूड टाकून परतून घ्यावी. त्यात भाजलेले दाणे सोलून घालावे. मीठ घालून व्यवस्थित हलवून घ्यावे. सगळ्यात शेवटी वरून थोडे तिखट टाकून थोडे परतून गॅस बंद करावा.  खास टिप्स :  * जिऱ्याची पूड नसल्यास … Read more

चहा | Indian Tea Recipe

indian tea recipe in marathi

चहा ( Tea ) चहाशिवाय आमचे अजिबात पान हलत नाही असे म्हणणारे अनेक लोक आपल्याला दिसतात. खरं तर चहाचा शोध कसा कुठे कोणी लावला, या पेक्षा चहा जास्त चांगला कोण बनवतं, पाण्याचा कि दुधाचा, आलं टाकावं कि नाही हे प्रश्न कोणत्याही चहा प्रेमीला आधी महत्वाचे वाटतात.  म्हणूनच झटपट, सोपा तरी एकदम एनर्जी देणारा चहा कसा बनवावा (how to … Read more

समोसा

samosa recipe in marathi

समोसा सारणासाठी साहित्य :   मटारचे दाणे तीन वाट्या, तीन मोठे बटाटे, बारीक चिरलेला कांडा अर्धा वाटी, आठ ते दहा हिरव्या मिरच्या, एक तुकडा आले, कोथिंबीर पाव वाटी, मीठ, लिंबू  कृती :  बटाटे उकडून त्याच्या बारीक फोडी कराव्या. मटारचे दाणे एक डाव तेलावर पाण्याचा हबका देऊन वाफवून घ्यावे. हिरव्या मिरच्या, आले बारीक करून घ्यावे. बटाट्याच्या फोडी, … Read more

साबुदाणा खिचडी | Sabudana khichdi recipe for fasting in marathi

उपवासाचे पदार्थ : साबुदाणा खिचडी  साहित्य :  तीन वाट्या साबुदाणा, दोन वाट्या भाजलेल्या शेंगदाण्याचे कूट, पाच ते सहा हिरव्या मिरच्या, पाऊण चमचा मीठ, पाऊण चमचा साखर, तीन चमचे तूप किंवा तेल, अर्धा चमचा जिरे  कृती :  खिचडी करण्याआधी सुमारे चार ते पाच तास साबुदाणा चार चमचे पाणी ठेवून भिजवावा. खिचडी करायला घेताना साबुदाणा हाताने ताटात मोकळा … Read more