चिकन ६५ घरच्याघरी सोप्या पद्धतीने बनवा | Chicken 65 recipe easy
जर तुम्हाला बाहेरच्या हॉटेलमध्ये मिळणारा मसालेदार, कुरकुरीत आणि रसाळ चिकन ६५ आवडत असेल, तर ही रेसिपी तुमच्यासाठीच आहे!
दक्षिण भारतीय स्टाईलमधील हा प्रसिद्ध स्टार्टर आता तुम्ही घरच्या घरी अगदी परफेक्ट बनवू शकता.
- वेळ: 30–40 मिनिट
- सर्विंग: 3–4 जणांसाठी
- चव: मसालेदार, तिखट
- प्रकार: स्टार्टर / स्नॅक
या पदार्थाचे नाव “चिकन ६५” का पडलं असेल?
काही जण म्हणतात 1965 साली ही डिश तयार झाली, तर काही म्हणतात 65 मसाले वापरले जात होते!
खरं काहीही असो… चव मात्र 100% भन्नाट आहे!
साहित्य :
फ्रेश चिकन ५०० ग्रॅम, टोमॅटो २, हिरव्या मिरच्या ३ , हळद १ चमचा, लिंबू १, लाल तिखट ३ चमचे, दही ३ चमचे, कढीपत्ता १०-१२ पाने, गरम मसाला अर्धा चमचा, मीठ स्वादानुसार, लोणी ३ चमचे
कृती :
chicken 65 easy recipe
१ तास अगोदर चिकनला लाल तिखट, हळद, थोडे मीठ आणि लिंबाचा रस लावून बाजूला ठेवून द्या.
तळण्यासाठी कढईत तेल घ्या. चिकनला चांगले खरपूस तळून घ्या.
टोमॅटो मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. टोमॅटो मध्ये दही मिसळा. आता हे मिश्रण बाजूला ठेवा.
कढईत लोणी टाका. लोण्यात कढीपत्ता, मिरच्या परतून घ्या. आता टोमॅटो वाटण टाका. २-३ मिनिटे शिजू द्या.
तळलेले चिकनचे तुकडे टाका. झाकण लावून मंद आचेवर १०-१२ मिनिटे शिजू द्या.गरम मसाला आणि मीठ टाका. झाकण ठेवा आणि ५ मिनिटे शिजू द्या.
गरमा गरम चिकन ६५ एन्जॉय करा!
खास टिप्स :
- रस्सा जास्त पातळ हवा असल्यास थोडे पाणी टाका.
- तिखट, मीठ, हळद, लिंबाचा रस लावलेले चिकनचे तुकडे पातळ बेसन मध्ये सुद्धा बुडवून तळू शकता. यामुळे आणखी खमंग चव येते.
Wah… नागपूरी सावजी पण try करा