कुरकुरीत शेव | Shev Recipe

कुरकुरीत शेव (Shev Recipe)

shev recipe in marathi, shev kase banvave, diwali faral, diwali faral list, diwali faral recipe in marathi

साहित्य : 

डाळीचे पीठ / बेसन अर्धा किलो, २ चमचे तेलाचे मोहन, हळद आणि मीठ चवीप्रमाणे, १ चमचा ओव्याची पूड, तळण्यासाठी तेल

कृती : 

डाळीची पीठ चाळून घ्या. त्यात ओव्याची पावडर मिक्स करून ती हि चाळून घ्या.

मीठ आणि हळद घालून त्यात तेलाचे कडकडीत मोहन टाकावे आणि पीठ सैलसर भिजवा. 

मध्यम आकाराच्या शेवपात्रात घालून कडकडीत तेलात शेव पाडून घ्या. शेव तेलात जास्त करपू देऊ नये. 

शेव थंड झाल्यावर हवाबंद डब्ब्यात भरून ठेवा. 

हे शेव १५-२० दिवस टिकतात. नुसते खाण्यास हि चांगले लागतात किंवा चिवड्यात मिसळून हि खाऊ शकतात. 

खास टिप्स :  

* शेव गरम असतांना डब्ब्यात भरू नये. शेव सादळतात. कुरकुरीत राहत नाही. 

* तेल गरम करताना गॅस आधी मंद आणि मग मध्यम करून तेल गरम करावे. म्हणजे शेव एकदम जळत नाहीत.