समोसा
सारणासाठी साहित्य :
मटारचे दाणे तीन वाट्या, तीन मोठे बटाटे, बारीक चिरलेला कांडा अर्धा वाटी, आठ ते दहा हिरव्या मिरच्या, एक तुकडा आले, कोथिंबीर पाव वाटी, मीठ, लिंबू
कृती :
बटाटे उकडून त्याच्या बारीक फोडी कराव्या. मटारचे दाणे एक डाव तेलावर पाण्याचा हबका देऊन वाफवून घ्यावे. हिरव्या मिरच्या, आले बारीक करून घ्यावे. बटाट्याच्या फोडी, मटार, कोथिंबीर, मीठ, वाटलेल्या हिरव्या मिरच्या, आले एकत्र कालवावे. त्यावर अर्धे लिंबू पिळून सारण सारखे करून ठेवावे.
पारीसाठी साहित्य :
तीन वाट्या मैदा, अर्धी वाटी तेल आणि चवीनुसार मीठ
कृती:
मैदा चाळून घ्यावा. त्यात अर्धी वाटी तेलाचे मोहन आणि अर्धा चमचा मीठ घालून घट्ट भिजवावे. नंतर हाताने मळून घ्यावे. छोट्या लिंबाएवढा गोळा करून लाटावे. त्याचे दोन भाग करावे.
एका भागाची हाताने खणासारखी घडी घालावी. वरून त्यात मोठा चमचा सारण घालावे. नंतर वरच्या बाजूने दुमडावे. त्याला ओल्या कणकेचे किंवा मैद्याचे बोट फिरवून चिटकावे.
सगळे समोसे झाल्यावर तेलावर खरपूस तळून घ्यावे. गॅस मिडीयम ठेवावा.
खायला देतांना टोमॅटो सॉस बरोबर खायला द्यावा.
