तिळाचा गोड भात

तिळाचा गोड भात

साहित्य :

चांगल्या प्रतीचा तांदूळ दोन वाटी, साखर दीड वाटी, पांढरे तीळ एक वाटी, खवलेला नारळ एक वाटी, जायफळ-वेलची पूड, काजूचे काप-बेदाणे, दोन टे. स्पू. तूप, दोन लवंगा, दोन मिरी, चार वाटी पाणी.

कृती :

तांदूळ धुवून घ्या. पातेल्यात तूप टाकून त्यात लवंगा-मिरी टाकून तांदूळ टाकून परतवा. पाणी घालून मोकळा भात शिजवून घ्या. परातीत थंड करण्यास ठेवा. तीळ भाजून जाडसर कुटून घ्या. भात-तिळाचा कूट-खोवलेला नारळ-साखर-जायफळ-वेलची पूड एकत्र करून घ्या. एका जाड बुडाच्या पातेल्यात थोडे तूप टाकून मिश्रण पसरवा. त्यावर काजूचे काप व बेदाणे पसरवून मंद गॅसवर ठेवून भात वाफवून घ्या.