सुधारस | Sudha Ras Recipe

सुधा रस Sudha Ras Recipe

साहित्य :

दोन वाट्या साखर, एक वाटी पाणी, अर्धा ते एक लिंबाचा रस, चार वेलदोड्याची पूड, एक चिमूट केसर, दोन चमचे बेदाणे, एक चमचा काजू बदामाचे उभे काप 

कृती : 

प्रथम पाणी आणि साखर एकत्र करून उकळी आणावी. 

हाताला चिकट लागण्याइतपत पाक तयार झाला कि गार करायला ठेवावा. 

अगदी गार झाल्यावर त्यात वेलदोडा पूड, केशर, बेदाणा, काजू बदाम काप आणि आंबटगोड चव लागेल इतपत लिंबाचा रस घालावा. 

हा सुधारस तीन ते चार दिवस चांगला टिकतो आणि पोळीसोबत किंवा पानाची डावी बाजू सजवायला चांगला पर्याय होतो. 

sudha ras recipe, sudha ras recipe in marathi, सुधा रस, सुधारस, marathi authentic recipes, marathi recipes, traditional marathi recipes,