असावा सुंदर चॉकलेटचा बंगला
लहानपणीचे जग हे रंगीबेरंगी आणि सुंदर असते. अश्या वेळेस छान गोड गोड चॉकोलेटचे आपले घरच असले तर? हि कल्पना किती भन्नाट आहे ना.
असावा सुंदर चॉकलेटचा बंगला हे बालगीत आपल्या सगळ्यांच्याच आवडीचे. त्याच बालगीताचे lyrics इथे देत आहोत.

असावा सुंदर चॉकलेटचा बंगला
चंदेरी सोनेरी चमचमता चांगला
चॉकलेटच्या बंगल्याला टॉफीचं दार
शेपटीच्या झुपक्यानं झाडून जाईल खार
गोल गोल लेमनच्या खिडक्या दोन
“हॅलो, हॅलो !” करायला छोटासा फोन !
बिस्कटांच्या गच्चीवर मोर छानदार
पेपरमिंटच्या अंगणात फुलं लाललाल
चांदीच्या झाडामागं चांदोबा रहातो
मोत्यांच्या फुलांतून लपाछपी खेळतो
उंच उंच झोक्याचा खेळ रंगला
मैनेचा पिंजरा वर टांगला
किती किती सुंदर चॉकलेटचा बंगला
चंदेरी सोनेरी चमचमता चांगला
असावा सुंदर चॉकलेटचा बंगला, baal geete, lyrics in marathi, asava sundar chocolate cha bangla marathi baal geet lyrics, boli marathi,