लाल भोपळ्याची भाजी 

लाल भोपळ्याची भाजी 

साहित्य : 

लाल भोपळा अर्धा किलो, अर्धी वाटी चण्याचे पीठ, एक मोठा चमचा तिखट, मीठ चवीनुसार, दोन मोठे डाव तेल आणि फोडणीचे साहित्य 

कृती : 

भोपळ्याची  साले काढून लांबट फोडी  करून घ्याव्यात. 

तेलाची हिंग हळद घालून फोडणी करावी आणि त्यात फोडी घालाव्या. अगदी किंचितसा पाण्याचा हबका द्यावा. 

कढईवर झाकण ठेवून मंद आचेवर हि भाजी शिजवून घ्यावी. मधून मधून परतत राहावी. 

भोपळ्याच्या फोडी मऊ झाल्यावर तिखट, मीठ आणि साखर घालावी. चण्याचे पीठ हाताने सगळीकडे भाजीवर भुरकावे. आणि चमच्याने चांगले हलवून घ्यावे. 

आणि पुन्हा एक चांगली वाफ येऊ घ्यावी भाजी झाल्यावर झाकू नये. म्हणजे वाफेचे पाणी भाजीत पडत नाही. 

हि भाजी वाढतांना वरून आवडीनुसार ओले किंवा कोरडे खोबरे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून वाढावी. 

Scroll to Top