परी
Marathi Baalgeet lyrics
पऱ्या म्हणजे चिमुकल्यांचा खास आवडीचा विषय. पऱ्या छान पंख असलेल्या, आकाशात भरारी मारणाऱ्या, सुंदर, निरागस.
पण एक परी होती जराशी वेंधळी, तिची झाली थोडी गडबड.
नक्की काय झाले ते आपण या कवितेतून बघूया
परी मराठी बालगीत
एक होती परी
तिला सापडली दोरी
दोरी होती लांब
जवळ होता खांब
दोरी बांधली खांबाला
परी लागली चढायला
दोरी तुटली खस्सकन
परी पडली धप्पकन !
तुम्हाला हे मराठी बालगीत कसे वाटले ते आम्हाला नक्की सांगा.