शिळासप्तमीची कहाणी 

आटपाट नगर होतं. तिथं एक राजा होता. त्यानं एक गांव वसवला. जवळ तळं बांधलं. कांहीं केल्या पाणी लागेना. जळदेवतांची प्रार्थना केली. त्या प्रसन्न झाल्या. “राजा, राजा, तुझ्या सुनेचा वडील मुलगा बळी दे. पाणी लागेल.” हें राजानं ऐकलं. घरीं आला. मनीं विचार केला, फार दुःखी झाला. पुष्कळ लोकांच्या जिवांपेक्षा नातवाचा जीव अधिक नाहीं. पण ही गोष्ट … Read more

मंगळागौरीची कहाणी 

मंगळागौरीची कहाणी  आटपाट नगर होतं. तिथं एक वाणी होता. त्याला कांहीं मुलगा नव्हता. त्याच्या घरीं एक गोसावी येई. ‘अल्लख’ म्हणून पुकार करी. वाण्याची बायको भिक्षा आणी. “निपुत्रिकाच्या हातची भिक्षा घेत नाही,” असें म्हणून तो चालता होई. ही गोष्ट तिनं नवर्‍याला सांगितली. त्यानं तिला युक्ती सांगितली. “दाराच्या आड लपून बस, ‘अल्लख’ म्हणतांच सुवर्णाची भिक्षा घाल.” अशी … Read more