घास घे रे तान्ह्या बाळा

घास घे रे तान्ह्या बाळा मराठी बालगीत lyrics

तान्ह्या बाळाला जेवू घालणे म्हणजे प्रत्येक आईसाठी तारेवरची कसरत असते. बाळ दुडूदुडू इकडे तिकडे पळत असतांना, ताट घेऊन त्याच्या मागे धावणे. एक एक घास बाळाला भरवतांना आईची दमछाक होते. पण हि दमछाक हि आईला आवडते. कारण, बाळासोबत एक घास चिऊचा, एक घास काऊचा असे बोलतांना या सुंदर आठवणीच बनत असतात. 

तान्ह्या बाळासाठी असेच एक लोकप्रिय बालगीताचे बोल इथे देत आहोत. 

ghas ghe re tanhya bala marathi baal geet lyrics boli marathi घास घे रे तान्ह्या बाळा मराठी बालगीत
घास घे रे तान्ह्या बाळा मराठी बालगीत

घास घे रे तान्ह्या बाळा
पायी रुणझुण घुंघुर वाळा ॥ ध्रु ॥

तिकडून आली चिऊ चिऊ, तिकडून आला काऊ काऊ
बाळा चा घास कोणाला देऊ? ॥ १ ॥

एक घास गाईचा, एक घास ताईची
बाळाचा घास दूध आणि साईचा ॥ २ ॥

हे हि वाचा:-

करंगळी मरंगळी 

असावा सुंदर चॉकलेटचा बंगला 

आपडी थापडी गुळाची पापडी

Scroll to Top