एक होते खोबरे

एक होते खोबरे मराठी बालगीत lyrics

बालगीतांची गंमतच आगळी. लहान मुलांना आपल्या मराठीची ओळख वेगवेगळ्या शब्दांनी करून देणे, त्यांचे मनोरंजन करणे,  आणि गाण्यातून हे सगळे होत असेल तर गंमतच वेगळी.

रोजच्या वापरातले खोबरे, पण त्याचे इतके गोड वर्णन या बालगीतात कवयित्री शांता शेळके यांनी केले आहे कि अगदी मोठ्यांनाही हे गाणे गुणगुणायचा मोह होईल. 

एक होते खोबरे या बालगीताचे बोल इथे देत आहोत. 

ek hote khobre marathi baal geet lyrics boli marathi एक होते खोबरे मराठी बालगीत
एक होते खोबरे मराठी बालगीत

एक होते खोबरे
गाल काळे गोबरे

ताईला ते दिसले
तिने त्याला किसले

त्यात घातली साखर
वेलची अन् केशर

छान केली खिरापत
अशी तिची करामत ॥

हे हि वाचा:-

थेंबा थेंबा 

चांदोबा लपला 

अटक मटक चवळी चटक  

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top