एक होते खोबरे मराठी बालगीत lyrics
बालगीतांची गंमतच आगळी. लहान मुलांना आपल्या मराठीची ओळख वेगवेगळ्या शब्दांनी करून देणे, त्यांचे मनोरंजन करणे, आणि गाण्यातून हे सगळे होत असेल तर गंमतच वेगळी.
रोजच्या वापरातले खोबरे, पण त्याचे इतके गोड वर्णन या बालगीतात कवयित्री शांता शेळके यांनी केले आहे कि अगदी मोठ्यांनाही हे गाणे गुणगुणायचा मोह होईल.
एक होते खोबरे या बालगीताचे बोल इथे देत आहोत.

एक होते खोबरे
गाल काळे गोबरे
ताईला ते दिसले
तिने त्याला किसले
त्यात घातली साखर
वेलची अन् केशर
छान केली खिरापत
अशी तिची करामत ॥